Breaking News

महाड इमारत दुर्घटनेच्या मुख्य बिल्डरची न्यायालयात शरणागती

महाड ः प्रतिनिधी
महाड शहरातील तारिक गार्डन दुर्घटनेतील दोन आरोपींना यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले असून गुरुवारी (दि. 3) इमारतीचा मुख्य बिल्डर फारूक काझी याने न्यायालयात शरणागती पत्करली. त्यानंतर महाड शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
महाड शहरातील तारिक गार्डन इमारत कोसळून 16 जणांना प्राण गमवावे लागले होते. या दुर्घटनेला जबाबदार धरून बिल्डरसह अन्य पाच जणांवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील एका आरोपीला दुर्घटनेनंतर काही दिवसांतच, तर दुसर्‍या सहआरोपीलाही त्यानंतर अटक करण्यात आली, मात्र बिल्डर फारूक काझी अद्याप फरार होता. काझीला अटक करण्यात आली नव्हती.
दरम्यान, काझीने अटकपूर्व जामिनासाठी महाड न्यायालयात अर्ज दाखल केला. यानंतर न्यायालयासमोर काझीने शरणागती पत्करली. महाड शहर पोलिसांकडून जिल्हा सरकारी वकील म्हणून संतोष पवार या वेळी उपस्थित होते, अशी माहिती प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी काशीद यांनी दिली. काझीला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार असून त्याच्या पोलीस कोठडीकरिता प्रयत्न केले जाणार आहेत. या दुर्घटनेतील अन्य तीन जण अद्याप फरार आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply