Breaking News

जेएसडब्ल्यू कंपनीकडून कांदळवनाची कत्तल

कारवाई करण्याची अ‍ॅड. महेश मोहिते यांची मागणी

अलिबाग ः प्रतिनिधी
धरमतर खाडीकिनारी भराव टाकून कांदळवन नष्ट करणार्‍या जेएसडब्ल्यू कंपनीवर पर्यावरण कायदा तसेच वन अधिनियम अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी केली आहे.
अ‍ॅड. मोहिते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि. 4) निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मजा बैनाडे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. भाजप अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, शहर अध्यक्ष अ‍ॅड. अंकित बंगेरा, कुर्डूसचे सरपंच अनंत पाटील, अमित पाटील आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.
कोविड-19 मुळे संपूर्ण देशात टाळेबंदी करण्यात आली होती. याचा गैरफायदा घेऊन या कालावधीत जेएसडब्ल्यू कंपनीने धरमतर खाडीलगत असलेल्या कांदळवनाची कत्तल करून 20 मीटर रूंदीचा व तीन किमी लांबीचा भराव टाकला. हा भराव करून जेएसडब्ल्यू कंपनीने शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले आहे. कंपनीने सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले तसेच कांदळवन तोडून पर्यावरणाची हानीदेखील केली आहे. त्यामुळे जेएसडब्ल्यू कंपनीचे सर्वेसर्वा सज्जन जिंदाल व कंपनी प्रशासनाविरुद्ध पर्यावरण कायदा तसेच वन कायद्यांतर्गत करावाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

टाळेबंदीचा गैरफायदा घेऊन जेएसडब्ल्यू कंपनीने खाडीकिनारी भराव टाकून सुमारे 300 ते 350 एकर जागेवरील कांदळवन नष्ट केले आहे. याद्वारे शासकीय जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. असे असताना प्रशासन गप्प आहे. जिंदाल यांच्या दबावामुळेच अधिकारी जेसएडब्ल्यू कंपनीला पाठीशी घालत आहेत.
-अ‍ॅड. महेश मोहिते, अध्यक्ष, दक्षिण रायगड जिल्हा भाजप

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply