Breaking News

तरुणीचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : प्रतिनिधी

मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून एका तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 13) घडली. त्यामुळे मंत्रालयात एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने संरक्षक जाळीमुळे या तरुणीचा जीव वाचला आहे.

प्रियंका गुप्ता असे या तरुणीचे नाव असून, ती उल्हासनगर येथील असल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून ही तरुणी मंत्रालयात येत होती, अशी माहिती समोर आली आहे. शुक्रवारी दुपारीही ती मंत्रालयात आली होती. त्या वेळी अचानक तिने मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. ही तरुणी पहिल्या मजल्यावरील संरक्षक जाळीवर पडल्याने तिचा जीव वाचला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या तरुणीला रुग्णालयात नेले.

घटना घडल्यानंतर मंत्रालयातील सर्व कर्मचारी घटनास्थळी गेले. ही तरुणी संरक्षक जाळीवर विव्हळत असताना अनेकजण बघ्याच्या भूमिकेत होते. काही लोक फोटो काढत होते, तर काही व्हिडिओ शुटींग करताना दिसत होते. पोलिसांनी तरुणीला संरक्षक जाळीतून बाहेर काढले. या तरुणीच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

Check Also

‘दिबां’च्या स्मृतिदिनानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी (दि. …

Leave a Reply