पाच जणांचा मृत्यू 259 रुग्णांना डिस्चार्ज

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 4) कोरोनाचे 290 नवीन रुग्ण आढळले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 259 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 223 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर 194 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 67 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर 65 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात पनवेल सहयोग नगर सोसायटी, खांदा कॉलनी सेक्टर 13 सहयोग सोसायटी आणि खारघर सेक्टर 10 शंकर रेसिडेंसी येथील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 41 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2182 झाली आहे. कामोठेमध्ये 56 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2704 झाली आहे. खारघरमध्ये 36 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 2564 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 39 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2368 झाली आहे. पनवेलमध्ये 45 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2260 झाली आहे. तळोजामध्ये 6 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 620 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 12698 रुग्ण झाले असून 10899 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.83 टक्के आहे. 1495 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 304 जणांचा मृत्यू झाला आहे.
अलिबागमध्ये तब्बल 123 नवे रुग्ण
अलिबाग : अलिबाग तालुक्यातील शुक्रवारी तब्बल 123 रुग्णांची भर पडली. त्यामुळे बाधितांची संख्या 2395 झाली आहे. दिवसभरात 28 रुग्णांनी कोरोनावर मात केली त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1806 झाली आहे. तर तालुक्यात 525 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
उरण तालुक्यात 37 पॉझिटिव्ह
उरण : उरण तालुक्यात शुक्रवारी 37 रुग्ण आढळले असून 16 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये चाणजे, भेंडखळ, जसखार, नागाव प्रत्येकी तीन, करंजा रोड, कुंभारवाडा, नवीन शेवा, करंजा, चीर्ले, जासई, प्रत्येकी दोन, गणपती मंदिरजवळ साई सदन, मुळेखंड, नेव्हल कॉलनी, मच्छी मार्केट मोरा, चाणजे, वारीक अली, धसाखोशी खोपटा, बौद्धवाडा समाज मंदिर जवळ, बोकडवीरा, बापूशेठ वाडी, रांजणपाडा, आनंद नगर, बोरी साई प्रेरणा सोसायटी येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.