जोधपूर ः वृत्तसंस्था राजस्थानमधील काळवीट शिकारप्रकरणी निर्दोष सुटलेले बॉलिवूड कलाकार सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, नीलम कोठारी, तब्बू आणि दुश्यंत सिंह या पाच जणांना जोधपूर हायकोर्टाने नोटीस पाठवली आहे. यापूर्वी जोधपूरच्या सत्र न्यायालयाने या पाच जणांना दोषमुक्त केले होते, सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात राजस्थान सरकारने जोधपूर हायकोर्टात धाव घेतली आहे. यातील प्रमुख आरोपी अभिनेता सलमान खान याला यापूर्वीच दोषी ठरवत सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तो सध्या जामिनावर आहे. 1998मध्ये ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे राजस्थान गेले होते. दरम्यान, शूटिंगचे काम संपल्यानंतर जवळच्या जंगलात भटकत असताना त्यांनी एका काळविटाची शिकार केली होती. काळविटाच्या हत्येवर स्थानिक बिष्णोई समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सलमान खान आणि अन्य सहकलाकारांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. सलमानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम 51खाली आरोप असून त्यासाठी कमाल सहा वर्षे कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे.
Check Also
नैना प्राधिकरणाने जनहिताबाबतची भूमिका स्पष्ट करावी
आमदार प्रशांत ठाकूर यांची अधिवेशनात मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त नैना प्राधिकरण जर जनतेच्या हिताचा …