जनरल कामगार संघटनेचा पुढाकार

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
जेएनपीटी जनरल कामगार संघटनेच्या पुढाकाराने इलेक्ट्रिकल मेन्टेनन्समधील दोन इंजिनियर्स आणि आठ सुपरवायझर यांचा गेल्या पाच वर्षापासून प्रलंबित असलेला एरीयेस जेएनपीटी जनरल कामगार संघटनेच्या वतीने प्रत्येकी दोन लाख 75 हजार मिळवून देण्यात आला एकूण 35 लाख मिळवून दिले त्याबद्दल अधिकारी आणि युनियनचे पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील, कार्याध्यक्ष सुधीर घरत, सचिव जनार्दन बंडा आणि जेएनपीटीचे माजी विश्वस्त रविंद्र पाटील तसेच महेश इंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा उद्योगपती राजेंद्र पडते आणि सोबत गोपाल बेरा, अशोक हिस्सल, सुरेश पवार, अभय नाईक, अतीक तूंगेकर, राजेश चव्हाण, अजित शेट्टे, रातिकांत स्वाईन, सतिश गायकवाड आणि प्रफुल नाईक उपस्थित होते.