Breaking News

सोमवारपासून राज्यातील शाळा होणार सुरू; अनेक शिक्षकांना कोरोनाची लागण

मुंबई ः प्रतिनिधी
मुंबईसह काही महापालिका वगळता राज्यातील शाळा सोमवार (दि. 23)पासून सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या कोविड-19 चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये अनेक शिक्षकांना कोरोनाची लागण
झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय कितपत योग्य असेल, असा सवाल पालक आणि विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे.
शाळा सुरू करण्यास राज्य सरकारने दिलेल्या परवानगीनुसार सोमवारपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. सर्व शिक्षक आणि कर्मचार्‍यांची कोविड आरटीपीसीआर चाचणी केली जात असून, त्यात अनेक जण पॉझिटिव्ह आढळत असल्याचे समोर आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या शाळा सुरू करू नयेत. राज्य सरकारने आपला निर्णय स्थगित करावा, अशी मागणी होत आहे. शाळा सुरू करून विनाकारण कोरोनाला निमंत्रण देऊ नये. शाळा सुरू केल्या तरी पालक आपल्या पाल्याला आताच्या परिस्थितीत शाळेत पाठविण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून शाळा व शिक्षण सुरू ठेवावे, असा सूर शिक्षक संघटना आणि पालकांतून उमटत आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply