Breaking News

भाजपच्या प्रशिक्षण वर्गामधून विचारमंथन

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष प्रशिक्षण विभागाच्या वतीने आयोजित पनवेल परिसरातील मंडलनिहाय प्रशिक्षण वर्गांचा रविवारी (दि. 22) समारोप झाला. या दोन दिवसीय उपक्रमामध्ये विविध विषयांवर विचारविनिमय करून आगामी काळातील वाटचालीबद्दल दिशा ठरविण्यात आली. अखेरच्या सत्रात उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.
भाजप महाराष्ट्र प्रशिक्षण विभागाच्या वतीने दर तीन वर्षांनी हे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येत असतात. त्यानुसार पनवेलमध्ये मंडलनिहाय प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. पनवेल शहरसाठी खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात, पनवेल ग्रामीण आणि खारघर-तळोजा या मंडलांसाठी उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आणि कामोठे मंडलसाठी तेथील सौ. मिलन प्रल्हाद पै सभागृहात या वर्गांचे आयोजन करण्यात आले होते.  
या विविध प्रशिक्षण वर्गांमध्ये आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, महापौर डॉ. कविता चौतमोल, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्यासह आजी माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक-नगरसेविका, विविध मंडलांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये रविवारी सायंकाळी अखेरच्या सत्रामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. भाजप हा प्रथम देश, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या तत्त्वाने कार्यरत असणारा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज देशाने एक वेगळी उंची गाठली आहे. राज्यातही देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे यशस्वीपणे सरकार चालविले. आता विरोधी पक्षनेते म्हणून ते जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवित आहेत. आपणही जनतेच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सदैव कार्यरत राहिले पाहिजे. मग लोक आपोआपच पक्षाकडे अधिक प्रमाणात आकर्षित होतील, असे त्यांनी सांगितले. या वेळी त्यांनी भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत तसेच अश्विनी भुवड यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply