Breaking News

म्हसळ्यात दिवसाढवळ्या रस्त्यावर बिबट्याचा संचार

म्हसळा ः प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यात दिवसाढवळ्या एक बिबट्या रस्त्याच्या मधोमध शांतपणे बसलेला दिसल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
शनिवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या दरम्यान म्हसळा-देवघर कोंड-कुडतोडी या रस्त्यावर मनीष संतोष चाळके यांना बिबट्याचे दर्शन झाले. मनिष म्हसळ्याहून आपल्या गावी कुडतोडी येथे जात होते. बिबट्या देवघरकोंड रस्त्याच्या वरील बाजूस वन विभागाच्या काजूचा माळ या भागांत रस्त्याच्या मधोमध निवांत बसला होता. मनिषने या परिररांत अजून एक मोठा बिबट्या असून त्याचेही अनेक वेळा दर्शन होत असते असे सांगितले. याबाबत मनिष यांनी त्वरीत वनविभागाला कळविले.
चिचोंडा वनपाल प्रविण शिंदे यांनी कुडतोडी, देवघर, देवघर कोंड या परिसरांतील नागरिकांना सर्तकतेचा इशारा दिला असून रात्रीच्या वेळी जंगलात एकटे न फिरणे, जनावरांना एकटे न सोडणे याबाबत जनजागृती केली आहे.

फेब्रुवारी ते मार्चपर्यंत लागलेल्या वणव्यांमध्ये वन खात्याचे 25 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. यामुळे जंगलातील श्वापदे सुरक्षित आणि खाद्य असणार्‍या ठिकाणी वास्तव्य करतो. जंगले उद्ध्वस्त झाल्याने या श्वापदांनी आपला मोर्चा आता नागरी वस्तीकडे वळविला आहे.
-जनार्दन सुर्यवंशी सेवानिवृत डीएफओ

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply