पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेचे सुरक्षा रक्षक महेश अर्जुन वाहूळे यांनी एका कॉलेज युवतीचा हरवलेला मोबाइल परत केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जहिर अहमद उस्मानगनी शेख यांची कन्या हदा शेख ही बस मधुन याकुब बेग हायस्कुलला जात असतांना महापालिकेच्या गेट समोर तीचा मोबाइल बॅग मधुन खाली पडला. महापालिका गेटवर सरक्षेसाठी तैनात असलेले दक्ष सरक्षा रक्षक महेश वाहळे यांना सापडला. वाहळे यांनी या मोबाइलच्या नंबर वरुन संबंधितांना फोन करुन त्यांचा मोबाइल हरवल्याची खात्री केली.
संपुर्ण घटनाक्रम महापालिका मुख्यालयाचे उपआयुकत जमीर लेंगरेकर यांच्यासमोर वाहूळे यांनी कथन केला. तद्नंतर कॉलेजयुवती हुदा शेख, तीचे वडील जहिर अहमद उस्मानगनी शेख यांना महापालिकेत बोलावुन त्यांचा मोबाइल त्यांना परत केला.
या वेळी शेख व तीच्या वडीलांनी उपआयुक्त लेंगरेकर व सुरक्षा रक्षक महेश वाहूळे यांचे आभार व्यक्त केले. मोबाइल सॅमसंग कंपनीचा असुन त्यांची किंमत सुमारे रु. 20,000/होती. सुरक्षा रक्षक महेश वाहूळे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मोबाइल धारकांनी आपल्या मोबाइलमध्ये पासवर्ड टाकावा विशेषता कॉलेजच्या युवक, युवतीनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन उपआयुक्त जमीर लेंगरेकर यांनी या वेळी केले.