Breaking News

नवी मुंबईतील रस्ता सुरक्षा अभियानास उत्स्फू र्त प्रतिसाद

नवी मुंबई ः प्रतिनिधी

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत वाहतूक विभागाचा रस्ता सुरक्षा अभियान-2021 कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा सोमवारी (दि. 18) दुपारी 4 वाजता नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय मैदान, सीबीडी-बेलापूर, नवी मुंबई येथे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्घाटन समारंभ कार्यक्रम फेसबुकवर लाइव्ह करण्यात आला.

कार्यक्रमास पोलीस सहआयुक्त डॉ. जय जाधव, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) डॉ. बी. जी. शेखर पाटील, पोलीस उपआयुक्त (वाहतूक) पुरुषोत्तम कराड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे शाखा) प्रवीणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त (विशेष शाखा) रूपाली अंबुरे, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) अभिजित शिवथरे, सतीश देशमुख, प्रतिष्ठित नागरिक, जड अवजड वाहतूक असोसिएशनचे पदाधिकारी, वाहतूक विभागातील पोलीस अधिकारी, अंमलदार व उपप्रदेशिक परिवहन विभाग, पनवेल येथील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

पोलीस उप आयुक्त पुरुषोत्त कराड यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून रस्ता सुरक्षेबाबत जनजागृतीच्या दृष्टिकोनातून उद्घाटनपर भाषणात वाहनचालकांनी तसेच नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार असल्याचे सांगून त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई वाहतूक विभागातर्फे जनतेमध्ये व वाहनचालकांमध्ये केल्या जाणार्‍या जनजागृती कार्यक्रमामध्ये पत्रकार बांधवांची मोठ्या प्रमाणात मदत होत असते. म्हणून या वर्षी रस्ता सुरक्षा अभियानामध्ये नवी मुंबई वाहतूक विभागातर्फे छायाचित्रकार व जनतेसाठी छायाचित्रण या स्पर्धेचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी येथे करण्यात येणार असल्याचे सांगितले. रस्ता सुरक्षा अभियानामध्ये सर्व धार्मिक स्थळी येणार्‍या भाविकांना रस्ता सुरक्षा अभियानाची माहिती देऊन जनजागृती करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने रस्ता सुरक्षा अभियानादरम्यान शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याकरिता पपेट शोमार्फत क्लासचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. 18 जानेवारी ते 17 फेबु्रवारी या कालावधीत 32वा रस्ता सुरक्षा अभियान साजरा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी त्यांच्या भाषणात रस्ता सुरक्षा अभियानादरम्यान शालेय विद्यार्थ्यांमध्ये शॉर्टफिल्मचे प्रसारण करून जनजागृती करण्यात येणार असून, वाहनचालकांसाठी विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply