Breaking News

कळंबोलीत श्रीराम मंदिर संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

भाजप नगरसेवक हरेश केणी यांची लाखाची मदत

कळंबोली ः प्रतिनिधी

अयोध्येतील प्रभू श्रीराम जन्मभूमी येथील राम मंदिराच्या उभारणीचा आरंभ झाला असून, त्याकरिता सर्व स्तरांतून आलेल्या निधीतून मंदिरासाठी हातभार लावला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर कळंबोलीत मकरसंक्रांतीचे औचित्य साधून श्रीराम मंदिर संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. मंदिर समिती कळंबोलीचे नगर अभियान प्रमुख संतोष मोकल यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शांताराम महाराज खानावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. विजय वेदपाठक यांनी श्रीराम मंदिराच्या उभारणीदरम्यान झालेल्या संघर्षाची माहिती दिली. या वेळी भाजप नगरसेवक हरेश केणी यांनी वडिलांच्या स्मरणार्थ एक लाख रुपयांचा धनादेश मंदिर निर्माणासाठी सुपूर्द केला. कार्यक्रमात विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष तसेच कळंबोलीतील नागरिकांनी सहभाग नोंदविला होता.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

मुंबई ः रामप्रहर वृत्तसमाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे …

Leave a Reply