Breaking News

रिस येथे दिव्यांगांच्या कार्यालयाचे उद्घाटन, नामफलकाचे अनावरण

मोहोपाडा : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटना आणि  दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना मोहोपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रहार दिव्यांग क्रांती संघटना खालापूर तालुका कार्यालयाचे उद्घाटन व नामफलकाचे अनावरण मोठ्या उत्साहात करण्यात आले. या वेळी तालुक्यातील अपंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. खालापूर तालुक्यातील दांड-रसायनी येथील दिव्यांग्यांना आपल्या समस्या मांडण्यासाठी रिस येथे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या दिव्यांग्यांसाठी विनामूल्य रिक्षासेवा फुलचंद लोंढे व दत्ता भागा कडू देणार आहेत. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिव्यांग संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष साईनाथ पवार यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन व नामफलकाचे अनावरण करण्यात आले. टाकेदेवी रिक्षा चालक-मालक संघटनेचे सल्लागार फुलचंद लोंढे यांच्या वतीने दिव्यांगांसाठी मोफत रिक्षा प्रवास सुरू केला, तसेच दत्ता कडू व मधुकर शिंदे यांनीदेखील दिव्यांगांसाठी मोफत रिक्षा प्रवासाकरिता पुढाकार घेतला आहे. दिव्यांग संघटनेच्या वतीने फुलचंद लोंढे यांचा महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष साईनाथ पवार यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन-खालापूर तालुका अध्यक्ष मंगेश पार्टे, उपाध्यक्ष शैलेश कांबळे, सदस्य सखाराम म्हात्रे, सुनील माळी, ज्ञानेश्वर भोंडगे आदी या वेळी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply