मुंबई : प्रतिनिधी
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी मंगळवारी (दि. 2) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मंत्री व आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. मंदार हळबे हे आतापर्यंत दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत, तर मागील विधानसभा निवडणुकीत मनसेकडून डोंबिवली मतदारसंघाचे तिकीट हळबेंना देण्यात आले होते. त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यांनी मंगळवारी समर्थकांसह भाजपचे कमळ हाती घेतले. या सर्वांचे स्वागत करण्यात आले.