पनवेल : रामप्रहर वृत्त
प्रजापती समाज विकास मंडळ, नवी मुंबईतर्फे महाराजा दक्ष प्रजापती यांची जयंती आणि स्वातंत्र्यदिन सोमवारी (दि. 15) नवीन पनवेल येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व महाराज दक्ष प्रजापती यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थितांनी ‘जय जय कार’ म्हणत महाराज भगवान दक्ष प्रजापती यांच्या फोटोला पुष्प अर्पण केले. छोटे चित्रपट आणि मालिकांमध्ये कलाकाराची भूमिका साकारणारे सेलिब्रिटी दीपक प्रजापती यावेळी खास उपस्थित होते. संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष सी. पी. प्रजापती, सचिव विनोद प्रजापती, सर्व प्रजापती शक्ती ट्रस्टचे अध्यक्ष अजय प्रजापती, संतराम बीए फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र प्रजापती, दिलीप प्रजापती, ठाणे जिल्हाध्यक्ष गजेंद्र प्रजापती, चंद्रशेखर प्रजापती, डॉ.ज्ञान प्रकाश प्रजापती, डॉ. इंद्रजित प्रजापती, पूनम प्रजापती, ग्यानती प्रजापती, शिवप्रसाद प्रजापती, रामबचन प्रजापती आदींनी मेहनत घेतली.