Breaking News

‘राम प्रहर’च्या बातमीचा सकारात्मक परिणाम

उरणमधील उघड्या विद्युत डीपी झाल्या बंद

उरण : वार्ताहर

उरण शहरातील मुख्य रस्त्यावरील वीज महावितरणाच्या डीपी उघड्या होत्या. या उघड्या डीपींमुळे जीवित हानीची दाट शक्यता होती. त्याकडे संबंधित अधिकार्‍यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करीत होते, परंतु त्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात होते दै. राम प्रहरमध्ये 24 फेब्रुवारी 2021 रोजी वीज महावितरणाच्या अधिकार्‍यांनी त्वरीत लक्ष देऊन उघडे डीपीची दुरुस्ती करावी, अशी बातमी छापून आली होती. या बातमीच्या दणक्याने वीज महावितरणाच्या अधिकार्‍यांनी त्वरीत लक्ष देऊन उघड्या डीपींची दुरुस्ती केली आणि दोन डीपी बंद केले.

गेल्या चार ते पाच महिन्यांपासून उरण शहरातील प्रोफेशनल कुरिअरच्या जवळील व गांधी पुतळ्यासमोर, वाणी आळी प्रवेशद्वाराजवळ वीज महावितरणचे डीपी उघडे होते. त्यांची झाकणे तुटलेल्या अवस्थेत होती. नागरिकांच्या रहदारीचा रस्ता असल्याने जीवित हानी झाली असती. दैनिक रामप्रहरच्या बातमीमुळे हा धोका टळला. त्यामुळे नागरिक राम प्रहर दैनिकास धन्यवाद देत आहे.

उघड्या डीपींची समस्या ही गेली चार ते पाच महिन्यांपासूनची होती. त्याकडे लक्ष दिले जात नसल्याने शॉक लागून जीवित हानी आली असती. रामप्रहर दैनिकाच्या बातमीमुळे डीपीची झाकने बंद करण्यात आली. त्यामुळे मी नागरिकांच्या वतीने रामप्रहर दैनिकास धन्यवाद देत आहे. आभार मानत आहे.

-राकेश धनाजी भोईर, प्रोफेशनल कुरिअर मॅनेजर, उरण

डीपी उघडे होते हे धोकेदायक होते. सध्या तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्ती करण्यात आली आहे. तेथे लवकरच नवीन डीपी ऑर्डर करून लावण्यात येईल.

-हरिदास चोंडे, उपभियंता, महावितरण उरण

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply