Breaking News

पक्षी, प्राण्यांना पाणी पिण्याची व्यवस्था

सर्पमित्रांचा स्तुत्य उपक्रम

नवी मुंबई : प्रतिनिधी

उन्हाळ्याचे चटके सुरू झाल्यानंतर सर्वच सजीवांना पाण्याची अत्यंत गरज असते. मानव कोणत्याही प्रकारचे कष्ट करून पाण्याची भूक भागवतो, परंतु पक्षी व प्राण्यांना अपेक्षित असे उन्हाळ्यात पाणी मिळतेच असे नाही. म्हणून येथील सर्पमित्र व सामाजिक वृत्तीच्या नागरिकांनी एकत्र येऊन गवळी देव परिसरात 20 मातीची भांडी खास पक्षी व वन्यजीवांसाठी ठेवली असल्याची माहिती सर्पमित्र अमरजीत गुरुंग यांनी दिली.

गवळी देव हे ठिकाण रबाळे एमआयडीसी क्षेत्रात येते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वन्यजीव व पक्षी आढळून येतात. या ठिकाणी उन्हाळा येईपर्यंत पाणी मुबलक असते, परंतु जसे जसे उन्हाळ्याचे चटके सुरू होतात. तस तसे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. पाणी नसल्याने या ठिकाणी वन्यजीव मृत्युमुखी पडल्याच्या घटना देखील नियमित घडल्या आहेत.

अ‍ॅड. केतन सावंत, भावेश मढवी, नितेश पाटील, किरण वीरकर, सर्पमित्र अमरजीत गुरुंग, चंद्रकांत सर, प्रवीण भाई, सर्प रक्षक व वन्यजीव यांनी आर्थिक मदत करून 20 मातीची भांडी पाणी साठवण्यासाठी ठेकेली आहेत. यामुळे वन्यजीवांना पिण्याचे पाणी मिळणार आहे. सर्पमित्र आपापल्या परीने त्या मातीच्या भांड्यात पाणी साठवणूक करणार आहेत.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply