Breaking News

महिलांनी उद्योगांमध्ये प्रगती साधावी -नगराध्यक्षा प्रितम पाटील

पेण : प्रतिनिधी

महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे आले पाहिजे आपले कला गुण दाखवुन उद्योगात प्रगती साधण्याचे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी व्यक्त केले.

जीवन उत्कर्ष सामाजिक संस्थेच्या वतीने मैत्रीण माझी, उद्योजिका उद्याची या शिर्षकाखाली पेणमधील जैन समाज हॉल येथे 25 महिला बचतगटांचे वस्तु प्रदर्शन व विक्रिच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्या बोलत होत्या.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले कि, महिला बचत गटाच्या माध्यमातून आपली व कुटूंबाची आर्थिक जबाबदारी पार पाडण्याचे काम महिला करीत आहेत. बचतगटाच्या माध्यमातून मिळालेले पैशाचा वापर कुटुंबाच्या आर्थिक अडचणीत वापरण्याचे काम त्या करतात. ते कर्तव्य पार पडत असताना बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम होत आहेत. तालुक्यात महिला बचत गटांची संख्या जास्त आहे, परंतु यातील काही महिला बचतगट काम करत आहेत तर काहींना काम नसल्याने त्या मागे पडत आहेत. या महिला बचत गटांना व ग्रामीण भागातील महिलांना आत्मनिर्भर व सबलीकरणासाठी जीवन उत्कर्ष सामाजिक संस्था एक चांगले काम  काम करत असल्याचे नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी सांगून संस्थेचे कौतुक केले. 

या वेळी उपनगराध्यक्षा वैशाली कडु, महिला व बालकल्याण समिती संभापती अ‍ॅड. तेजस्वीनी नेने, अश्विनी गाडगीळ, तहसीलदार अरुणा जाधव, मुख्याधिकारी अर्चना दिवे, संस्थेचे अध्यक्ष तन्मय पाटील, मनीषा शेलार, परेश वास्कर, हेमंत गव्हाणकर आदित्य पाटील आदि उपस्थित होते.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply