Breaking News

अक्षर पटेलला कोरोनाची लागण

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
आयपीएलच्या आगामी पर्वाला काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असताना दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार फिरकीपटू अक्षर पटेल कोरोनाच्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये कोरोनाची लागण झालेला अक्षर हा दुसरा खेळाडू आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा खेळाडू नितीश राणाला कोरोनाने ग्रासले होते, मात्र त्यानंतर तो निगेटिव्ह आढळला. करोनाची लागण झाल्यानंतर अक्षरला क्वारंटाइन करण्यात आले आहे, असे फ्रेंचायझीने सांगितले. 9 एप्रिलला आयपीएलचा पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. दुसर्‍या दिवशी म्हणजेच 10 एप्रिलला दिल्लीचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी मुंबईत रंगणार आहे.
बीसीसीआयच्या नियमानुसार, जे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, त्यांना कोरोनाची चाचणी झाल्यापासून जैव सुरक्षित वातावरणाबाहेर 10 दिवसांसाठी वेगळे राहावे लागते. या कालावधीत खेळाडूला कोणताही व्यायाम न करता आराम करणे गरजेचे आहे. शिवाय संघाचे डॉक्टर त्यांच्याबद्दल अपडेट घेत असतात. प्रकृती खालावली तर, खेळाडूला रुग्णालयात दाखल केले जाते.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply