Breaking News

‘मेट्रो’बाबत लपूनछपून मुलाखती देऊ नका आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना टोला

मुंबई ः प्रतिनिधी

मेट्रो कारशेडवरून भाजपने शिवसेनेवर कडक शब्दांत हल्ला चढविला आहे. केंद्र सरकारचे आदेश धुडकावून मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच बांधण्याची घोषणा शिवसेनेने केली आहे. त्याबाबतचा आरेचा निर्णय रद्द केल्याने भाजप आता जनहितासाठी आक्रमक झाला आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी या विषयावर थेट चर्चा करण्याचे आव्हान आदित्य ठाकरे यांना दिले आहे. मेट्रो कारशेडवर लपूनछपून मुलाखती देऊ नका. थेट आमने-सामने या, असे शेलार यांनी म्हटले आहे. शेलार म्हणाले की, अस्मितेची ढाल करून इंच इंच जमीन आमचीच हा हट्ट शिवसेनेने सोडला पाहिजे. केवळ अहंकारी वृत्तीमुळे या मेट्रो कारशेडला उशीर होत असून त्याची पूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल. कारशेडच्या प्रस्तावामुळे सॉल्ट पॅनच्या लँडबाबत अप्रत्यक्षरीत्या उद्या होणार्‍या 50 हजार कोटींच्या जागांच्या हस्तांतरणाच्या घोटाळ्याची पायाभरणी आपण काँग्रेससोबत करताय की काय, असा सवालही शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. कांजूरमार्गची जागा ही महाराष्ट्राचीच असून त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमधील वाद आता आणखी पेटण्याची शक्यता आहे. मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. भाजपने मात्र व्यापक जनहिताच्या दृष्टीने राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध केला होता. आता या वादात केंद्र सरकारनेही उडी घेतली आहे. केंद्र सरकारने कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. याबद्दल केंद्राने राज्याच्या मुख्य सचिवांना एक पत्रही पाठवले आहे. कांजूरमार्गमधील जागा मिठागराची असून त्यावरचा हक्क अद्याप सोडला नाही. त्यामुळे ही जागा एमएमआरडीएला देण्याचा निर्णय रद्द करा, असे पत्रच केंद्र सरकारने राज्याच्या सचिवांना पाठवले आहे. त्याचबरोबर कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे काम त्वरित थांबवा, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply