पनवेल : रामप्रहर वृत्त
वाजे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक बुधवारी (दि. 12) झाली. या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाच्या मथुरा मदन पाटील या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी मथुरा पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.
वाजे ग्रामपंचायतीच्या सरपंच अंजनी भालेकर यांनी राजीनाम्या दिल्याने सरपंच पदाची जागा रीक्त झाली होती. यासाठी बुधवारी निवडणूक झाली. यामध्ये भापजच्या मथुरा पाटील बिनविरोध विजयी झाल्या. त्याबद्दल त्यांचे अनेक मान्यवरांनी अभिनदंन केले.
या वेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, उपसरपंच गणेश पाटील, भाजप पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, शिवकरच्या माजी सरपंच मिनाक्षी ढवळे, ग्रामपंचायत सदस्य रेवन आत्माराम पाटील, अंजनी भालेकर, पदू नामदेव वाघ, भारती भालेकर, कमला कातकरी, काली शाम कातकरी, राजेश महादू भोईर, राघो बारकू पाटील, रुपेश भोईर, मदन पाटील, माजी उपसरपंच राजेंद्र भालेकर, शाम भालेकर, सुनील पाटील, भगवान बुवा पाटील, यशवंत बुवा पाटील, सीताराम बुवा जळे, विष्णू बुवा पाटील यांच्यासह पदाधिकारी, कर्याकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना रेनकोट, शिक्षकांना छत्री वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून …
RamPrahar – The Panvel Daily Paper