Breaking News

कोविडमान्य रुग्णालयांना ‘रेमडेसिवीर’ उपलब्ध करा; नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिका हद्दीतील खासगी कोविड-19 हॉस्पिटलकरिता परवानगी देण्यात आलेल्या हॉस्पिटलमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन दिले आहे, तसेच निवेदनाची प्रत माहितीस्तव आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांना पाठविली आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या देशभर सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. विषाणूची लागण नागरिकांना होऊ नये या करिता केंद्र सरकार शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. याच धर्तीवर कोरोनाची लागण अन्य व्यक्तींना होऊ नये, याकरीता पनवेल महानगरपालिका प्रशासनामार्फत योग्यती कायदेशीर उपाययोजना केली जात आहे. वाढत्या कोरोना रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे शासकीय रुग्णालय व खासगी हॉस्पिटलमधील वाढत्या रुग्णांना उपचार करण्याकरिता अत्यावश्यक असलेले रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता होत नाही. अनेक कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पनवेलकरांच्या मनामध्ये भितीचे वातावरण पसरून नागरिकांना रेमडेसिवीर इंजेक्शन मेडिकल व पनवेल महानगरपालिका प्रशासनाकडून उपलब्ध होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची गैरसोय होत असल्याची दिसून आलेली आहे. या अनुषंगाने पनवेल महानगरपालिकेमार्फत कोविड-19 हॉस्पिटलकरिता रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता केल्यास कोरोनाबाधित रुग्णांना त्यापासून उपचार करणे सोयीचे होईल. कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांना होणारा त्रास टळेल. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता पनवेल महानगरपालिकेमार्फत घेण्यात आलेल्या कोविड-19 खासगी हॉस्पिटलला देण्यात यावी.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply