उरण : वार्ताहर
उरण तालुक्यातील जासई नाका ते ऐकटघर धुतूम व दास्तान फाटा ते दिघोडे या रस्त्यांवर खड्डे पडून मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रायगड जिल्हा परिषदेने पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.दोन्ही रस्ते रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या जासई नाका ते ऐकटघर धुतूम या रस्त्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने या रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे मार्गक्रमण करणार्या वाहन चालकांना, प्रवासी नागरिकांना अपघाताचा सामना करावा लागत आहे. दोन्ही रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व रायगड जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.