Breaking News

राज्यातील पत्रकारांचे तातडीने लसीकरण करण्याची मागणी

पनवेल : वार्ताहर

कोरोना वैश्विक महामारीच्या काळात दीड वर्ष अविरत आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी सतत कार्यरत असणार्‍या पत्रकार बांधवांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन तत्काळ मोफत लसीकरण उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सत्यमेव जयते ट्रस्टच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आले आहे.

सत्यमेव जयते ट्रस्टचे अध्यक्ष शितल मोरे व महाराष्ट्र राज्य सरचिटणीस योगेश कदम यांनी सदर निवेदन ई-मेल द्वारे मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. फ्रन्टलाइन वर्कर्सचा दर्जा देण्याबरोबरच त्यांनी पत्रकारांच्या इतरही मागण्यांची पूर्तता करण्याबाबत विनंतीपूर्वक निवेदन केले आहे. ज्यामध्ये सर्व दैनिक, साप्ताहिक मासिक, नियतकालिके यांच्या संपादक, छायाचित्रकार आणि पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर चा दर्जा देऊन तात्काळ मोफत लसीकरण उपलब्ध करून द्यावी तसेच पत्रकारांना कोविड योद्धा म्हणून त्यांचा सन्मान करण्यात यावा. पत्रकारांना विमा संरक्षण कवच देऊन संक्रमित पत्रकारांचा शासनाच्या योजनेतून मोफत उपचार करण्यात यावा.

मुख्यमंत्री यांनी 14 एप्रिल रोजी फक्त अधिस्वीकृती धारक पत्रकारांनाच वृत्तांकन करण्याची मुभा दिली होती परंतु महाराष्ट्रात बोटावर मोजण्याइतकेच अधिस्वीकृतीधारक पत्रकार आहेत. त्यामुळे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर अप्रत्यक्षपणे दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. सरसकट सर्व दैनिक, साप्ताहिक, मासिक व इतर सर्व प्रकारच्या वृत्तपत्राच्या संपादक, उपसंपादक, छायाचित्रकार, पत्रकार यांना वृत्तांकन करण्याची मुभा द्यावी. 14 एप्रिल ते आजपर्यंत अधिस्वीकृतीधारक नसलेल्या बहुतांशी पत्रकार, छायाचित्रकार यांच्यावर महाराष्ट्रात कलम 188, 269, 270 याप्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत ते तत्काळ मागे घेण्यात यावे. यासाठी यासंबंधीचे आदेश गृह विभागाने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच पोलीस आयुक्त यांना तात्काळ जारी करावे.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply