Breaking News

गोड्या पाण्यातील चिंबोर्‍यांना वाढती मागणी

मोहोपाडा : वार्ताहर

दांड-रसायनी रस्त्यावरील रिस टाटापॉवर हाऊसजवळ आसपासच्या परिसरातील आदिवासी महिला गोड्या चिंबोर्‍यांची विक्री करण्याकरिता बसत आहेत. पावसाचे प्रमाण कमी होऊन धुके पडण्यास सुरुवात झाल्याने नदीकिनारी, ओहोळ, तसेच शेतात आणि डोंगर कपारीत सापडणार्‍या गोड्या पाण्यातील चिंबोर्‍यांची विक्री करण्याकरिता बसत आहेत.

पौष्टिक आणि चविष्ट अशा गोड्या पाण्यातील चिंबोर्‍या म्हणजे खवय्यांच्या जिव्हाळ्याचा विषय बनल्याने त्या घेण्यासाठी खवय्यांची गर्दी होत आहे. या चिंबोर्‍यांचा रंग काला व हलका पिवळा असतो. या मोसमातील चिंबोर्‍यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या मोठ्या, भरलेल्या आणि चविष्ट असतात. म्हणून त्यांना अधिक मागणी असते. डोंंगराच्या कपारीत, नदी व ओहोळाच्या कडेला विशेषतः रात्रीच्या वेळी या चिंबोर्‍या सापडतात. त्यांना पकडण्यासाठी खूप मेहनत व दक्षता घ्यावी लागते. आदिवासी बांधव मोठ्या शिताफीने या चिंबोर्‍या पकडतात. काही हौशी तरुण व शेतकरीही रात्री टॉर्च आणि बत्ती घेऊन चिंबोर्‍या पकडायला जातात. चिंबोरीच्या आकारावरून तिला भाव दिला जातो. सध्या दोनशे ते चारशे रुपये वाटा असून यामध्ये सहा ते सात चिंबोर्‍या असतात. या चिंबोर्‍या खायला चविष्ट असल्याने ग्राहक आवडीने खरेदी करताना दिसत आहेत.

चविष्ट आणि आरोग्यवर्धक

असे म्हणतात की या चिंबोरीचा गरम रस्सा प्यायल्याने सर्दी दूर पळते. चिंबोरीच्या नांग्या तोडून त्याचा कच्चा रस दमा व संधिवात या आजारांवर गुणकारी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. वयोवृद्ध आणि लहान मुलांना ताकद येण्यासाठी चिंबोर्‍या खाल्ल्या जातात. नांगे व पेध्यातील मांस चविष्ट आणि गोड असते.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply