पनवेल ः रामप्रहर वृत्त
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शनिवारी (दि. 5) पनवेल येथील कोशिश फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. वृक्षारोपण अभियान खांदा कॉलनी येथील आयकर भवन येथे भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती पनवेल महापालिका सभागृह नेते तथा कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी दिली आहे.
या अभियानाद्वारे पाच हजार झाडे लावण्याचा संकल्प असून नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घ्यावा. यासाठी आपण आपल्या बाल्कनी, सोसायटी गार्डन किंवा इतर कोणत्याही मोकळ्या जागेवर रोप लावून या मोहिमेत सहभागी होऊ शकता. वृक्षारोपण करताना काढलेला आपला फोटो pr.koshishfoundation@gmail.com या ई-मेल आयडीवर किंवा 7757000000 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावा. आपण घेतलेल्या गौरवास्पद पुढाकाराचा एक भाग म्हणून आम्ही आपले स्वागत सहभाग प्रमाणपत्राने करू, असे परेश ठाकूर यांनी म्हटले आहे.