Breaking News

देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात समाजमाध्यमांवर अश्लाघ्य पोस्ट टाकणार्‍यांवर गुन्हे दाखल करा

पनवेल भाजपची मागणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
 महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात समाजमाध्यमांवर अश्लाघ्य पोस्ट टाकणार्‍या समाजकंटकांवर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा, अशी मागणी पनवेल भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि. 1) पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
 यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांना लेखी निवेदन दिले. या वेळी महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, शहर सरचिटणीस अमरिश मोकल आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या वैश्विक संकटातून बाहेर येण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातही विरोधी पक्ष म्हणून भाजप राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करीत आहे. तरीही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येक कृतीवर सामाजिक माध्यमांमध्ये काही ठरावीक लोकांकडून असंसदीय शब्दांत टीका होत आहे. घाणेरडी अश्लील व्यंगचित्रे पोस्ट करण्यात येत आहेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत आणि जनतेच्या मनात एक सुसंस्कृत आणि निष्कलंक नेता म्हणून त्यांनी ठसा उमटवला आहे, पण याचे भान न ठेवता काही विकृत मानसिकतेची मंडळी जो गलिच्छ प्रकार करीत आहे, तो निंदनीय आहे. त्यामुळे यासंदर्भात तत्काळ तपास करून विनाकारण बदनामी करणार्‍या समाजकंटकांवर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply