Breaking News

युक्रेनचा स्वीडनवर थरारक विजय

युरो कपमध्ये उपांत्यपूर्व फेरीचे आठ संघ निश्चित

ग्लासगो ः वृत्तसंस्था
युरो कप स्पर्धेच्या बाद फेरीतील शेवटच्या सामन्यात युक्रेनने स्वीडनला पराभूत करीत अटीतटीचा सामना 2-1च्या फरकाने जिंकला. या विजयाबरोबरच युक्रेन संघ पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत पोहचला आहे. दरम्यान, या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतील आठ संघ आता निश्चित झाले आहेत.
युक्रेन विरुद्ध स्वीडन सामन्यात 90 मिनिटांचा खेळ आणि त्यानंतर देण्यात आलेल्या अतिरिक्त 30 मिनिटांमध्येही 1-1ची बरोबर सुटली नाही. त्यामुळे शेवटची काही मिनिटे वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा सामनाही स्वित्झर्लंड विरुद्ध फ्रान्सच्या सामन्याप्रमाणे पेनल्टी शूट आऊटनेच निकाली निघणार असे वाटत असतानाच सामन्यातील 121व्या मिनिटाला युक्रेनने गोल केला. या गोलबरोबरच युक्रेनने निसटता विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.
ऑलेकझॅण्डर झिन्चोको याने सामन्याच्या 27व्या मिनिटाला युक्रेनला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अवघ्या 16 मिनिटांनी पहिले सत्र संपण्यास दोन मिनिटांचा अवधी असतानाच 43व्या मिनिटाला स्वीडनला इमील फोर्सबर्गने गोल करीत सामना 1-1च्या बरोबरीत आणला.
सामन्याच्या दुसर्‍या सत्रात दोन्ही संघाकडून गोल करण्यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले, पण कोणालच यश आले नाही. अखेर अतिरिक्त वेळ वाढवून देण्यात आला. त्या 30 मिनिटांमध्येही कोणाला गोल करता आला नाही. सामन्याचा निकाल लावण्यासाठी शेवटची काही मिनिटे एक्स्ट्रा टाइम म्हणून खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. युक्रेनच्या आर्टेम डोव्हबाय याने 120 मिनिटांनंतर देण्यात आलेल्या एक्स्ट्रा टाइमच्या पहिल्याच मिनिटाला निर्णायक गोल करीत आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
स्वित्झर्लंड, स्पेन, इटली, चेक रिपब्लिक, डेन्मार्क, बेल्जियम, इंग्लंड आणि युक्रेन यांनी अंतिम आठ संघांमध्ये स्थान मिळवले आहे. गतविजेता पोर्तुगाल आणि बलाढ्य फ्रान्स स्पर्धेबाहेर पडल्याने या स्पर्धेला यंदा नवा विजेता मिळणार आहे.
इंग्लंडकडून जर्मनीचा पाडाव
लंडन ः रहिम स्टर्लिंग आणि हॅरी केन यांनी साकारलेल्या गोलमुळे इंग्लंडने जर्मनीचा 2-0 असा पाडाव करीत युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. 1966नंतर इंग्लंडने बाद फेरीत प्रथमच जर्मनीला पराभूत करीत नवा इतिहास घडवला. स्टर्लिगने सलग तिसर्‍या सामन्यात इंग्लंडसाठी महत्त्वपूर्ण गोल साकारला, तर केनचा हा यंदाच्या युरो चषकातील पहिला गोल ठरला.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply