Breaking News

कायद्यासमोर कोणालाही पळवाट काढता येत नाही; दरेकरांचा अनिल देशमुखांवर निशाणा

मुंबई ः प्रतिनिधी

100 कोटी वसुलीप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स पाठवून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते, मात्र देशमुखांनी चौकशीसाठी उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे तसेच प्रत्येक चौकशीऐवजी ऑनलाइन जबाब देण्याची देशमुखांची तयारी असल्याचे पत्र त्यांनी ईडीला पाठवले आहे. कोरोनामुळे त्यांनी ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमातून आपला जबाब नोंदवणार असल्याचे सांगितले आहे. यावरून भाजप नेते व विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देशमुखांवर निशाणा साधला आहे. ‘कायद्यासमोर कोणालाही पळवाट काढता येत नाही!, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणात तपास यंत्रणा योग्य तो निर्णय घेतील’, असे प्रवीण दरेकरांनी ट्विट केले आहे तसेच कायदा हा सगळ्यांना सारखा असतो, कायद्यासमोर कितीही कुणी, काही कारण काढले तरी जाऊ शकत नाही. त्यामुळे ज्या काही कायद्याबाबत वयाच्या बाबतीत शिथिलता असतील, कायद्यामध्ये ज्या सूट असतील आजारपणाबाबत निश्चितपणे ते गृहीत धरूनच तशा प्रकारच्या सवलती किंवा ज्या काही शिथिलता देता येतील ते यंत्रणा देऊ शकते, कोर्ट देऊ शकते,’ असेही दरेकर म्हणाले आहेत.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply