Breaking News

सीमा पुनिया ऑलिम्पिकसाठी पात्र

पतियाळा ः वृत्तसंस्था
भारताची अनुभवी थाळीफेकपटू सीमा पुनिया हिने आंतरराज्य अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी दमदार कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान पटकावला.
2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक आणि आशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकावणार्‍या सीमाने 63.70 मीटर थाळीफेक करीत ऑलिम्पिकचा पात्रता निकष पार केला. 37 वर्षीय सीमा आता चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिने 2004  अ‍ॅथेन्स, 2012 लंडन आणि 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले होते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी सीमा ही भारताची दुसरी थाळीफेकपटू ठरणार आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply