Breaking News

कोटेश्वरी मंदिर येथे एसटी थांबा

मुरुड : प्रतिनिधी

येथील श्री कोटेश्वरी देवस्थान ट्रस्टतर्फे मंदिर परिसरात एसटी बस थांबा मिळावा, अशी मागणी मुरुड आगाराकडे करण्यात आली होती. आगार व्यवस्थापक युवराज कदम यांनी जागेची पहाणी करून, एसटी थांब्याची जागा निश्चित केली. त्यानुसार नुकतेच मंदिर परिसरात महामंडळाचा खांबा बसवण्यात आला. त्याचे लोकार्पण कोटेश्वरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नयन कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आगार व्यवस्थापक युवराज कदम, ट्रस्टचे उपाध्यक्ष मनोहर गुरव, खजिनदार नारायण पटेल, ट्रस्टी प्रमोद मसाल, मंगेश पाटील, सीकेपी समाज अध्यक्षा नैनिता कर्णिक, माजी मुख्याध्यापिका उषा खोत यांच्यासह परिसरातील  नागरिक उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply