Breaking News

कोटेश्वरी यात्रेला भक्तांची गर्दी

मुरुड : प्रतिनिधी

शहराची ग्रामदेवता कोटेश्वरी मातेची यात्रा गुरुवारी (दि. 18) खूप उत्साहात संपन्न झाली. मातेच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. मुरुड परिसरातील भाविकांसह  कल्याण, डोंबिवली, ठाणे, पुणे, मुंबई येथून आलेल्या भक्तांची संख्या मोठी होती. सुमारे 15 हजारांपेक्षा जास्त भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतल्याचे कोटेशवरी देवस्थान ट्रस्ट तर्फे सांगण्यात आले.  दरवर्षी चैत्र शुद्ध चतुर्दशीला मुरुड शहराची ग्रामदेवता कोटेश्वरी मातेची यात्रा भरते. यात्रेच्या पुर्वसंध्येला शहरात देवीची पालखी मिरवणुक काढण्यात आली होती. तत्पुर्वी कोटेशवरी देवस्थान ट्रस्ट तर्फे सुमारे 80 लोकांनी देवीचे मूळ स्थान पदमदुर्ग किल्ल्यात जाऊन देवीला गार्‍हाणे घातले. आणि यात्रेसाठी प्रकट होण्याचे आवाहन केले. त्यावेळी देवीची पूजा व आरती घेण्यात आली. यावेळी कोटेश्वरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नयन कर्णिक, खजिनदार नारायण पटेल, सदस्य मंगेश पाटील, अरुण बागडे, प्रकाश चव्हाण, रुपेश जामकर, प्रमोद मसाल यांच्यासह भाविक उपस्थित होते.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply