Breaking News

दोन डोस घेऊनही रेल्वेचे तिकीट मिळेना; प्रवासी नाराज

कर्जत : बातमीदार

उपनगरीय लोकल प्रवास हा कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी बंद करण्यात आला होता, पण नुकत्याच काढलेल्या परिपत्रकानुसार ज्यांनी दोन डोस घेतले आहेत त्यांना सिजनल तिकीट देण्यात येत असून त्या प्रवाशांना कोणतेही सिंगल अथवा रिटर्न तिकीट मिळणार नसल्याने प्रवासी वर्गात कमालीची नाराजी आहे.

सर्व रेल्वेस्थानकांवर त्याप्रमाणे बोर्ड लावण्यात आले असून ज्या प्रवाशांना आपल्या एखाद्या कामासाठी प्रवास करायचा असल्यास त्यांना तो प्रवास करणे शक्य होत नाही.सिंगल तिकीट मिळणार नाही त्याऐवजी पास काढा असे रेल्वेकडून सांगण्यात येत असल्याने एका दिवसासाठी प्रवास करणार्‍या प्रवाशांना त्या पासचा काय उपयोग? त्यांनी आपले जादाचे पैसे का वाया घालवावे? अगोदरच मेताकुटीला आलेल्या जनतेला आणखी हे सरकार किती लुबाडणार, असा संतप्त सवाल प्रवासी वर्ग करताना दिसत आहे. वाढलेल्या महागाईचा फटका जनसामान्यांना बसत असतानाच या निर्णयाने प्रवाशांत कमालीचा संताप आहे.

ज्या माणसाला कामाकरिता प्रवास करायचा असेल त्याला सीजन तिकीट किंवा पासची सक्ती का केली जात आहे? लसीकरण झालेले असून इतर सर्व गोष्टी सुरळीत चालू झालेल्या असताना या तिकिटांसाठी अडवणूक कशाला? प्रवाशांनी पाससाठी दहापट जास्त पैसे का मोजावे? या निर्णयाच्या विरोधात आवाज उठविणे गरजेचे आहे.

-किशोर गायकवाड, अध्यक्ष, भिवपुरी रोड प्रवासी संघटना

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply