Breaking News

विद्यार्थ्यांच्या आहारात गोमाशी प्राथमिक शाळेच्या परसबागेतील भाज्या

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील गोमाशी गावातील प्राथमिक शाळेत परसबाग उपक्रम राबविण्यात आला आहे. या परसबागेतील विविध भाज्या विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनात वापरल्या जातात. तसेच शाळा परिसरात विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांना त्यांची नावे दिली असून, या झाडांचे संगोपन विद्यार्थी करत आहेत. ही झाडे विद्यार्थ्यांनी दत्तक घेतली आहेत.

विद्यार्थी व गोमाशी शाळा व्यवस्थापन समिती व माता पालक तसेच शाळा प्रमुख अजितकुमार जाधव व उपशिक्षिका प्रिती भोजकर या सर्वांच्या सहकार्याने परसबाग उपक्रम राबविला जात आहे.  शाळा परिसरात लावलेल्या पालेभाज्यांचा उपयोग शाळेतील मध्यान्ह भोजन योजनेकरिता

होत आहे.

गोमाशी शाळेच्या परिसरात विविध झाडांची लागवड करण्यात आली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड दत्तक देऊन वृक्ष संवर्धन व पर्यावरणरक्षण हा  उपक्रमदेखील राबविला जात आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व संगोपनाची मूल्ये जोपासली जात आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply