
पनवेल : रामप्रहर वृत्त
राष्ट्र सेवा दल संघटनेच्या रायगड जिल्हा शाखा आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने 8 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत 12 ते 18 वर्षे वयोगटांतील तरुण-तरुणींसाठी पनवेल तालुक्यातील बांधनवाडी येथे सात दिवसीय व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप रविवारी (दि. 14) बालदिनी करण्यात आला.
शिबिरार्थींनी प्रशिक्षणादरम्यान शिकविलेल्या लेझीम, दांडिया, कवायत, पथनाट्य यांसह विविध विषयांवरील बौद्धिक आणि परिवर्तन गीतांची प्रात्यक्षिके उपस्थितांसमोर सादर करून सर्वांची मने जिंकली. समारोप समारंभाचे अध्यक्ष राष्ट्र सेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा विश्वस्त प्रकाश कांबळे, कुष्ठरोग निवारण समिती शांतीवनचे कार्याध्यक्ष अॅड. प्रमोद ठाकूर, विश्वस्त विनायक शिंदे, ज्येष्ठ सेवादल सैनिक जीवराज सावंत, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय सचिव अल्लाउद्दीन शेख, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष संतोष ढोरे, जिल्हा संघटक सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, पनवेल तालुका अध्यक्ष नितीन जोशी, राज्य मंडळ सदस्य सुशीला वामन, पनवेल पंचायत समिती सदस्य मनीषा मोरे, ज्ञानेश्वर मोरे, ज्योती पाटील, कोकण सागरचे व्यवस्थापक ताजीयन करोटी, ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे विश्वस्त मनीषा पाटील, संदीप म्हात्रे, प्रकल्प समन्वयक उदय गावंड, समुपदेशक जयेश शिंदे, राजू पाटील, तेजस चव्हाण, बळीराम पाटील, राजू पाटील, राजेश रसाळ, रणजित पाटील, स्मिता रसाळ, राजेश पाटील, विपीन माटे, रूपेश रसाळ आदी उपस्थित होते.
या वेळी शिबिरामध्ये उत्कृष्ट व्यवस्थापन व भोजन व्यवस्था करणार्या कार्यकर्त्या जीविका मोरे, अनुसया घरत, वैशाली म्हात्रे आणि सरिता पाटील यांना सन्मानित करण्यात आले.