Breaking News

नवी मुंबईत बालदिनी स्वच्छ चित्रकला स्पर्धा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

बालदिनाचे औचित्य साधून ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ला सामोरे जात असताना स्वच्छ नवी मुंबई शहराविषयी मुलांच्या मनात असलेल्या संकल्पनांना मूर्तरूप देण्याच्या उद्देशाने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ चित्रकला स्पर्धा इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. हा उपक्रम 2997 विद्यार्थ्यांनी सहभागी होत यशस्वी केला.

कोपरखैरणे येथील प्रशस्त निसर्गोद्यानात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेची जगप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांनी प्रशंसा केली. या वेळी मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, सुलेखनकार, चित्रकार अच्युत पालव, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, शिक्षण विभागाचे उपायुक्त जयदीप पवार, सहाय्यक आयुक्त अनंत जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी ऋतुजा संखे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्साहाने सहभागी होत, ‘माझे शहर-माझा सहभाग’, ‘प्लास्टिकमुक्त माझे शहर’, ‘स्वच्छतेचा बालमहोत्सव’ या तीनपैकी आपल्या आवडत्या विषयावर मनातील स्वच्छता संकल्पनांना चित्रांतून रंग व आकार दिला. या स्वच्छ चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात येणार असून पहिल्या तीन क्रमांकांना 11 हजार, सात हजार व पाच हजार रुपये, तसेच 10 उत्तेजनार्थ चित्रकृतींना प्रत्येकी एक हजार रुपये अशा रकमेची पारितोषिके स्मृतिचिन्हांसह प्रदान केली जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रशस्तिपत्र दिले जाणार आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply