पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलमधील के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय या संस्थेच्या वतीने बालदिनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ सभासद दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते पं. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
संस्थेचे कार्याध्यक्ष विनायक वत्सराज यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संस्थेचे कार्यवाह काशिनाथ जाधव यांनी पं. जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली, तसेच संस्थेच्या सदस्य अॅड. माधुरी राजन थळकर (कवयित्री) यांनी त्यांच्या काव्यसंग्रहातून मुलांसाठी कविता सादर करून मुलांना प्रश्न विचारले. आदित्य स्वप्नील चव्हाण (इयत्ता सहावी) या विद्यार्थ्याने ध्येयमंत्र सादर केला. या वेळी 10 ते 15 मुलांनी सहभाग घेतला असून त्यांना खाऊचे, तसेच लहान मुलांची पुस्तके भेट म्हणून देण्यात आली.
या वेळी राजकुमार ताकमोगे, रमेश चव्हाण, चंद्रकांत कुरघोडे, डॉ. मिलिंद म्हस्के, विनोद शेरे, अक्षय जोशी, कोळी आदी उपस्थित होते. ग्रंथपाल निकेता शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल व सहाय्यक ग्रंथपाल शारदा कदम यांनी विशेष मेहनत घेतली.