पाली ः प्रतिनिधी
राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनचा प्रादूर्भाव वाढत असून रायगडातही रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडवर पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुरातत्व विभागाने बंदीचे आदेश जारी केले आहेत. किल्ले रायगडावरील रोपवे ही पर्यटकांना बंद ठेवण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. रोज मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्येत भर पडत आहेत. जिल्ह्यात दिवसा जमावबंदी, तर रात्रीची संचारबंदी लागू आहे. असे असले तरी पर्यटक आजही मोठ्या संख्येने पर्यटनासाठी जिल्ह्यात येत आहेत. किल्ले रायगडवरही पर्यटक, शिवभक्त, अभ्यासक येत असतात, मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुरातत्व विभागाने पर्यटकांना किल्ले रायगडावर येण्यास बंदी घातली आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे.
Check Also
पनवेल मनपा हद्दीतील पाणीपुरवठ्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली पाहणी
सर्व कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे …