पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींचा आणि संस्थांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाला समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रदान करण्यात आला.
या वेळी समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, सचिव विशाल सावंत, सल्लागार दीपक महाडिक, अॅड. मनोहर सचदेव उपस्थित होते.
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पनवेलमधील गुणवंत पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना, तसेच सामाजिक संस्थांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रभागी असलेल्या, तसेच कोविड काळात आणि पूर परिस्थितीत नागरिकांना दिलासा देणार्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाला समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
Check Also
अफवांच्या पिकाला सत्याच्या विचारांनी छेद द्या; सोशल मीडियावर सक्रिय अन् बोलके राहा!
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तआजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात …
RamPrahar – The Panvel Daily Paper