उरण : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील फुंडे येथील तु. ह. वाजेकर विद्यालयात गुरुवारी (दि. 13) लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यालयाचे चेअरमन कृष्णा कडू, प्राचार्य एम. एच. पाटील, उपमुख्याध्यापक व्ही. एल. नरवडे, पर्यवेक्षक जी. सी. गोडगे व एस. जी. म्हात्रे, ज्युनिअर कॉलेज प्रमुख व्ही. के. कुटे, सांस्कृतिक विभागप्रमुख एच. एन. पाटील, दर्शना माळी, डी. डी. पाटील, एस. टी. म्हात्रे, तसेच सर्व सेवकवृंद यांच्या हस्ते लोकनेते दि. बा. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. या वेळी विद्यालयाचे चेअरमन कृष्णा कडू यांनी दि. बा. पाटील साहेब यांचा जीवनपट सांगताना त्यांनी शेतकरी आणि भूमिपुत्र यांच्यासाठी केलेल्या कार्याची माहिती सांगितली.