मोहोपाडा : प्रतिनिधी
आपटा फाटा ते रसायनी या मुंबई-गोवा महामार्गाला जोडणार्या अंतर्गत रस्त्याच्या डागडुजीची मागणी करण्यात येत आहे. गेली कित्येक वर्षे पाठपुरावा करूनही रस्त्याची डागडुजी करण्यात आलेली नाही. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्याने दुचाकी वाहनांचे नेहमीच अपघात होत असतात. मागील 15 दिवसांत या ठिकाणी चार अपघात घडले. त्यामधील आपटा गावातील ग्रामस्थ विलास कदम यांच्या हाताला दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले आहे. नवीन प्रवाशांसाठी तर हा रस्ता म्हणजे मृत्यूचे दारच आहे. भविष्यात जर या खड्ड्यांमुळे अपघातात कोणी मृत्युमुखी पडले, तर सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदारी घेईल का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.