Breaking News

विक्रम मिनीडोअर चालक संघटनेचा पेणमध्ये एल्गार

लेखी आश्वासनानंतर आरटीओ टाळे ठोको आंदोलन स्थगित

पेण : प्रतिनिधी

आपल्या प्रलंबित मागण्याची पूतर्ता करावी, या मागणीसाठी रायगड जिल्हा विक्रम मिनीडोअर चालक-मालक संघटनेने सोमवारी (दि. 24) पेण आरटीओ कार्यालयाला टाळे ठोको महसूल बंद आंदोलन केले. या वेळी परिवहन आयुक्तांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

बदली वाहन आदेशावर इड-तख इको टॅक्सी वाहनास इंधन म्हणून उछॠ पासिंग करावी. पेण, अलिबाग क्षेत्रातील 6+1 वाहनांना दोन वर्ष वयोमर्यादा वाढवून मिळावी. कोरोनामुळे मयत झालेल्या चालक-मालकांना परिवहन विभागाकडून मदत मिळावी. कोविड महामारीत 3+1 परवाना धारकांना शासनाकडून सानुग्रह अनुदान मिळाले तेच अनुदान विक्रम, मिनिडोअर, मॅजिक, इको या मीटर टॅक्सी परवाना धारकांना मिळावे, कोविड काळात ज्या परवान्याची मुदत संपली आहे व वाहन पासिंग करण्याच्या योग्यतेचे नाही, असे परवाने नुतनीकरण करताना व वाहन स्क्रॅप करताना योग्यता प्रमाणपत्र व विमा प्रमाणपत्राची मागणी न करता वस्तुस्थितीचा निकष लावून परवान्याचे नुतनीकरण करावे. मीटर कॅलिब्रेशन सुविधा केंद्र पेण येथे सुरू करावे या मागण्यांकरिता सोमवारी विक्रम चालक मालक संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरटीओ कार्यालयाला टाळे ठोको महसूल बंद आंदोलन करण्यात आले. सकाळपासूनच विक्रम मिनीडोअर ईको चालक-मालक मोठ्या संख्येने आरटीओ कार्यालय बाहेर आंदोलनाकरिता जमले. त्यांनी परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांना कार्यालयात जाण्यापासून रोखले व आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या.

पेण उपविभागीय परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी या वेळी आंदोलकांशी चर्चा केली, तसेच आंदोलकांच्या मागण्या परिवहन आयुक्तांपर्यंत पोहोचविल्या. गुरुवारी, शुक्रवारी प्रशासकीय अधिकारी व विक्रम मिनीडोअर ईको संघटनेच्या पदाधिकार्‍यांसोबत बैठक घेऊन योग्य तो तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन परिवहन आयुक्तांनी या वेळी दिले. त्यानंतर विजय पाटील यांनी आंदोलन तूर्त स्थगित झाल्याची घोषणा केली.

या आंदोलनात संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पाटील, खजिनदार सचिन पाटील, सचिव विकास पारंदे, राजीव भंडारी, राकेश राखाडे, सुधाकर यादव, शंकर पाटील, किशोर पाटील, दीपक म्हात्रे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply