Monday , June 5 2023
Breaking News

भाजपच्या भटके-विमुक्त सेलचा उत्तर रायगड जिल्हा दौरा उत्साहात

खोपोली : रामप्रहर वृत्त

भाजप भटके-विमुक्त मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांनी पक्षवाढीसाठी आपल्या सहकार्‍यांसोबत उत्तर रायगड जिल्हा दौरा केला. या दौर्‍यात खोपोली येथील पदाधिकार्‍यांसोबत संवाद साधला व येणार्‍या काळामध्ये संघटन वाढीसाठी कसे काम करावे याचे मार्गदर्शन केले.

खोपोली मंडळाचे अध्यक्ष संतोष लोहार यांचा अपघात झाला असल्याने त्यांच्या घरी जाऊन बबन बारगजे यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला भेट दिली. त्यानंतर कर्जत तालुक्यातील वेणगाव येथील भटके-विमुक्त समाजातील कार्यकर्त्यांच्या घरी सदिच्छा भेटी दिल्या व तेथील समस्या जाणून घेतल्या. संघटन वाढविण्याच्या दृष्टिकोनातून बांधवांसोबत चर्चा केल्या. त्यानंतर कडाव येथील सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गंगावणे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली व विविध विषयांवर चर्चा केली.

या दौर्‍यात बबन बारगजे यांच्यासह भाजप भटके-विमुक्त सेलच्या महिला प्रदेश सरचिटणीस सुहासिनी केकाणे, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षा विद्या तामखडे, रायगड जिल्हा सहसंयोजक उत्तम जरग, महिला मोर्चाच्या सहसंयोजिका नीता मंजुळे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत मंजुळे आदी उपस्थित होते. खोपोली येथे मंडल अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल व सरचिटणीस हेमंत नांदे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वेणगाव येथे मंडल अध्यक्ष मंगेश साळुंखे यांच्या घरी भेट दिली. या वेळी जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंडे, नगरसेवक बळवंत घुमरे आदी उपस्थित होते.

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …

Leave a Reply