Breaking News

मेक कळसगिरी मोअर ग्रीन उपक्रमाला रोह्यातील संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रोहे : प्रतिनिधी

तालुक्यातील सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन नुकताच मेक कळसगिरी मोअर ग्रीन हा उपक्रम राबविला. या वेळी सुमारे 65 जणांनी तांबडी सवाणे परिसरात प्रत्येकी दिडशे बियांची लागवड केली. त्यामुळे अंदाजे दोन हजार झाडे रूजतील व कळसगिरी हिरवागार होण्यात मदत होईल असा अंदाज आहे.

सह्याद्रीच्या रांगांतील कळसगिरीला अधिक हिरवेगार करण्याच्या दृष्टीने रोह्यातील विविध सामाजिक संस्था  दरवर्षी मेक कळसगिरी मोअर ग्रीन हा उपक्रम राबवतात. यंदा अ‍ॅड. हेमंत गांगल यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात लायन्स क्लब रोहा, रोटरी क्लब रोहा, रोटरी क्लब रोहा सेंट्रल, सृष्टी प्रतिष्ठान, ब्राम्हण मंडळ रोहा, मेहेंदळे विद्या संकुल शिक्षक वृंद, सी. डी. देशमुख महाविद्यालय या संस्था सहभागी झाल्या होत्या. यंदाही करंज, खैर, आपटा, शिवण या भारतीय मूळ असलेल्या झाडांना प्राधान्य दिले असून या झाडांमुळे जमिनीमध्ये वाढलेले आम्ल कमी होण्यास मदत होणार आहे. प्रा. सुकुमार पाटील यांच्या कवितांनी कार्यक्रमाला वेगळा रंग भरला.

वनक्षेत्रपाल मनोज वाघमारे व त्यांचे सहकारी या वेळी उपस्थित होते. तालुक्याच्या इतर भागातही वनसंपदेसंबंधी उपक्रम घेतले तर त्यास पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन वाघमारे यांनी दिले.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply