मुंबई : रामप्रहर वृत्त
कर्नाळा नागरी बँक घोटाळाप्रकरणी तुरूंगात असलेले बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या सुमारे 152 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) टाच आणली आहे. त्यामुळे विवेक पाटलांना आणखी एक दणका बसला आहे.
कर्नाळा बँकेत तब्बल 540 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. या संदर्भात सर्वप्रथम आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून आवाज उठविला तसेच या बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांना अटक करून ठेवीदारांना न्याय मिळावा यासाठी विविध यंत्रणांकडे पाठपुरावाही केला होता.
ईडीने गुरुवारी (दि. 12) कारवाई करीत विवेक पाटील, त्यांचे नातेवाईक आणि कर्नाळा महिला रेडीमेड गारमेंट्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची विस्तीर्ण जमीन, बंगला, निवासी संकुल इत्यादी स्वरूपातील मालकीची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे, ज्याचे मूल्य सुमारे 152 कोटी आहे, तर या प्रकरणात एकूण जोडणी अंदाजे 386 कोटी रुपये आहे.
Check Also
गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन
पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …