चौक : रामप्रहर वृत्त
लायन्स क्लब मुंबई कार्टर रोड आणि अनार्डे फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने चौक (ता. खालापूर) येथील सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात अल्ट्रा वॉटर फिल्टरेशन प्लांट उभारण्यात आला आहे. त्याच्या माध्यमिक शाळेतील स्टँडपोस्टचे उद्घाटन लायन्स क्लब ऑफ मुंबईचे अध्यक्ष अजय बाबला यांच्या हस्ते तर प्राथमिक शाळेतील स्टॅन्डपोस्टचे उद्घाटन विद्या प्रसारिणी सभा या संस्थेच्या कार्याध्यक्षा शोभाताई देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
अनार्डे फाउंडेशनचे राजेन धुलिया यांनी या वेळी शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात अल्ट्रा वॉटर फिल्ट्रेशनसंबंधी माहिती दिली. या प्लांटमुळे शाळेतील सतराशे विद्यार्थ्यांना शुध्द पाणी मिळणार असल्याबद्दल समाधान व्यक्त करून, संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. अविनाश देशमुख यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व भौतिक सुविधांचा आढावा घेतला. लायन्स क्लबचे सदस्य महेंद्रा अशेरसर, संस्थेचे सेक्रेटरी योगेन्द्र शहा यांनीही मनोगत व्यक्त केले.
अनिल बडेकर व लायन्स क्लब ऑफ मुंबईच्या सदस्या अॅड. उन्नती धुरंधर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. लायन्स क्लब ऑफ मुंबई कार्टर रोडचे प्रोमिला भाटिया, एस. टी. आनंद, डॉ. महेश मुनशी, शरीयर करीम, प्रकाश कुडाणी, कणिष्क जयंत, श्यामलता भाटिया, फाउंडेशनचे राजेश नायक, मुख्याध्यापिका सुलभा गायकवाड, शाळेचे मुख्याध्यापक बादहा भोमले, देवानंद कांबळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. शरद कुंभार यांनी मानले.