Breaking News

अर्थसंकल्पात मालमत्ताकर, पाणीपटटी वाढवू नये

नवी मुंबई पालिकेला आमदार गणेश नाईकांच्या सूचना
नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबई महापालिकेने अर्थसंकल्प 2023 मध्ये मालमत्ताकर किंवा पाणीपटटीत कोणतीही दरवाढ करू नये, अशी सुचना लोकनेेेते आमदार गणेश नाईक यांनी पालिका प्रशासनाला केली आहे. आरोग्य, शिक्षण, दळणवळण, पर्यावरण, पायाभूत सुविधांसाठी भरीव निधीची तरतूद करण्याबरोबरच 111 प्रभागांमध्ये नागरिकांच्या मागणीनुसार सुचवलेल्या विविध नागरी सुविधा कामांसाठी निधी राखीव ठेवावा, अशी मागणी देखील आमदार गणेश नाईक यांनी केली आहे. पालिकेचा अर्थसंकल्प तयार होत आहे. या अर्थसंकल्पासाठी लोकनेते आमदार नाईक यांनी नवी मुंबईतील विकासाच्या अनुषंगाने अनेक मौलिक सुचना केल्या आहेत. यामध्ये विकास कामांसोबतच नागरिकांच्या हिताच्या सुचना करण्यात आल्या आहेत. या सुचनांचे निवेदन गुरुवारी (दि. 9) महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना देण्यात आले. निवेदनात केलेल्या सुचनांचा समावेश येत्या बजेटमध्ये करावा, अशी विनंती या निवेदनामध्ये करण्यात आली आहे. करण्यात आली. नवी मुंबई पालिकेत आमदार गणेश नाईक यांची एकहाती सत्ता असताना त्यांच्या सुचनेनुसार वीस वर्षे महापालिकेने एकदाही मालमत्ता कर आणि पाणीपटटीत वाढ केली नाही. यापुढील पाच वर्षे देखील प्रॉपर्टी आणि वॉटर टॅक्समध्ये कोणतीही वाढ करू नये, यासाठी लोकनेते आमदार नाईक आग्रही आहेत. त्यानुसार मागील दोन वर्षे लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी अर्थसंकल्पात मागणी करून मालमत्ताकर आणि पाणीपट्टी वाढवू दिली नाही.
नवी मुंबई पालिकेत सध्या प्रशासक म्हणून राजेश नार्वेकर हे काम पाहत आहेत. निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधींचे सभागृह अस्त्विात आल्यानंतर बजेटमध्ये आवश्यक विकासकामांना आणि जन कल्याणाच्या योजनांसाठी निधीची तरतूद अगोदरच केलेली असावी, याकरीता सुचनांचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले आहे. कोरोना काळात सर्वसामान्यांची आर्थिक स्थिती बिघडलेली होती.
शिक्षण, आरोग्य आणि रोजचे खर्च भागविताना नाकी नऊ आले होते. आता कुठे नागरिक कोरोनाच्या कठीण काळातून सावरत असताना त्यांच्यावर करवाढीचा बोजा टाकणे योग्य होणार नाही. ज्या प्रमाणे मागील वर्षी मालमत्ता व पाणीकर न वाढवता जनतेला दिलासा देण्यात आला आहे त्याप्रमाणे यंदाच्या बजेटमध्येदेखील दिलासा द्यावा, असे नमूद करून उत्पन्नाचे अन्य स्त्रोत शोधून त्यामधून पालिकेने आपले उत्पन्न वाढवावे, असा सल्ला आमदार नाईक यांनी दिला आहे. आमदार गणेश नाईक यांनी भविष्यात नवी मुंबईत आवश्यक आरोग्य, शिक्षण, पायाभूत, पर्यावरण, दळणवळणाची कामे, नागरी सुविधा, भविष्यातील शहराच्या आणि नागरिकांच्या गरजांनुसार सांप्रत काळात हाती घ्यावयाचे विकास प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण, परिवहन सेवा, महिला, युवक व ज्येष्ठांच्या कल्याणाच्या योजना इत्यादी विषयी त्यांच्या दूरदर्शी विकास धोरणांनुसार मौलिक सुचना केलेल्या आहेत.

 

‘या’ विकास कामांसाठी शिफारस..

पाणीपुरवठा – नवी मुंबईची वाढती लोकसंख्या पहाता भविष्यातील पाणीपुरवठा वाढविण्यासाठी, पाताळगंगा ते मोरबे धरणापर्यंत पाईपलाईन टाकून पावसाचे पाणी धरणामध्ये साठवणूक करावी, पाणी गळती थांबविण्यासाठी उपाययोजना कराव्यात; नाला व्हिजन – नाला व्हिजनअंतर्गत कामे; दळणवळण पायाभूत सुविधा – पार्किंगची सक्षम व्यवस्था, बेलापूर ते वाशी व वाशी ते ऐरोली आणि ऐरोली ते दिघा सर्व नोडला जोडणारा कोस्टल रोड, ठाणे – बेलापूर मार्गावरून वाशीकडून ठाण्याकडे जाणार्‍या मार्गावर महापे येथून कोपरखैरणेला जोडणार्‍या उड्डाणपुलाला नवी मार्गिका जोडण्याकरिता तरतूद करण्यात यावी. कनेक्टिविटी वाढून सुरळीत वाहतुकीसाठी उडडाणूलांसाठी ठाणे-बेलापूर रोडवर मुकुंद कंपनीसमोर भुयारी मार्ग, रबाळे तलावाजवळ उडडाणपूल, पावणे पुल येथे मार्गिका तयार करणे, तुर्भे नेक्सा शोरूम समोर भुयारी मार्ग, तुर्भे बास्फ कंपनी येथे मार्गिका, कोपरखैरणे गुलाबसन्स डेअरी व राजधानी स्वीट मार्ट येथे एस्केलेटर व स्कायवॉक; दिघा येथे ठाणे-बेलापूर रोडवर एस्केलेटर व स्कायवॉक – दिघा, ऐरोली, घनसोली, रबाळे, कोपरखैरणे, पावणे, वाशी, तुर्भे, जुईनगर, सानपाडा, नेरूळ, सिवूड, सीबीडी, बेलापूर परिसरातील वर्दळीच्या ठिकाणी स्कायवॉक उभरण्या करिता तरतूद करण्यात यावी. मोराज सर्कल येथे उडडाणपूल, नेरूळ चौक येथे उडडाणपूल, वजीरानी चौक येथे उडडाणपूल, टि. एस चाणक्य करावे येथे उडडाणपूल, सिवूड अक्षरचौक येथे उडडाणपूल, एनआरआय चौक येथे उडडाणपूल, सीवूड सेक्टर 50 येथे उडडाणपूल, आग्रोळी ते महामार्गाला जोडणारा उडडाणपूल, बेलापूर मार्गांवर भुयारी मार्ग, नमुंमपा आयुक्त निवास ते तेरणा कॉलेज उडडाणपुल, वाशी प्लाझा ते घणसोली उडडाणपूल, तुर्भे एपीएमसी चौक येथे उडडाणपूल युवक कल्याण – युवक प्रशिक्षण केंद्र; घनकचरा व्यवस्थापन – अत्याधुनिक कचरा प्रक्रीया केंद्र; आरोग्य व वैद्यकीय – नवी न रूग्णालयांची उभारणी, पॅरामेडिकल आणि नर्सिंग कॉलेज; आरोग्य सेवा सुविधा – नवी मुंबईतील नागरिकांसाठी मेडिकल विमा, महापे येथे सार्वजनिक रूग्णालय, तुर्भे येथ सार्वजनिक रूग्णालय, दिघा येथे सार्वजनिक रूग्णालय; बगिचे व पर्यावरण – बटरफलाय गार्डन, फलेमिंगो सफारी, पर्यावरण संवर्धन व प्रदुषण नियंत्रण योजना, एसटीपी, टीटीपी पाणी पुनर्वापर; शिक्षण – गुणवत्तापूर्ण शिक्षण, झोपडपटटयांमधील विद्यार्थ्यांसाठी रात्र शाळा, दिघा ऐरोली घणसोली कोपरखैरणे तुर्भे वाशी सानपाडा जुईनगर नेरूळ सीवूड, बेलापूर येथे वाचनालय, ई लायब्ररी करीयर मार्गदर्शन व अभ्यासिका, प्रत्येक नोडमध्ये सीबीएसई माध्यमाच्या शाळा, पालिका शाळांमध्ये अबॅकस शिक्षण; होल्डिंग पॉन्ड – होल्डिंग पाँडमधील गाळ काढणे व सुषोभिकरण; नागरी सुविधा – नवी मुंबई प्रवेशद्वार, कंडोमिनियम वसाहती अंतर्गत सुविधांची कामे, ट्रान्झिट कॅम्पची निर्मिती; पर्यटन – मत्स्यालयाची निर्मिती; जन कल्याण योजना – असंघटीत नाका कामगारांसाठी उन पावसापासून संरक्षण करणारे शेल्टर, बेघरांना विभागवार रात्र निवारा केंद्रे, ज्येष्ठ नागरिकांना नाममात्र दरात वैद्यकीय सेवा, नागरिकांसाठी मेडिकल कार्ड, निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी वृध्दाश्रम, आदिवासी समाजासाठी घरकुल योजना, नोकरदार महिलांच्या बाळांसाठी पाळणाघर ; क्रीडा – ऑलम्पिक एशियाड इ. जागतिक स्पर्धांची इत्यंभूत माहिती देण्यासाठी, अद्ययावत माहितीकेंद्र.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply