Breaking News

नवी मुंबईतील जत्रोत्सवाला प्रचंड प्रतिसाद

नवी मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र महोत्सव समिती तसेच भाजपा महामंत्री राजेश पाटील व माजी नगरसेवक काशिनाथ पाटील यांच्या माध्यमातून जुईनगर मधील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूला सेक्टर 22 येथे सुरू असलेल्या भव्य महाराष्ट्र जत्रोत्सवाला नवी मुंबइच्या जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
महोत्सव भाजप महामंत्री राजेश पाटील आणि माजी नगरसेवक काशिनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून ह्या जत्रोत्सवामध्ये लहान मुलांचे सांस्कृतिक कर्यक्रम आयोजित करून त्यांच्या कलागुणांना वाव देत हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. ह्या भव्य मेळाव्याला नागरिकांसह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवत कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत.
माजी विरोधी पक्ष नेते दशरथ भगत यांनी मेळाव्याला उपस्थिती दर्शवत सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला. जुईनगरमधील मुलांच्या उपजत कलागुणांना वाव देण्याचे काम महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे. मुलांना हक्काच व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यामुळे हेच विद्यार्थी पुढे जाऊन नवी मुंबईचे नाव उज्वल करतील असे दशरथ भगत यांनी यावेळी सांगितले .
या भव्य महोत्सवात शिरवणे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सांस्कृतिक कार्यक्रम दर्यासारंगा आगरी कोळी सांस्कृतिक कार्यक्रम स्वर्गीय जनार्दन पाटील विद्यालय शाळा क्रमांक 17 च्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. तसेच जेष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि स्थानिक मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तसेच शनिवार 11 फेब्रुवारी रोजी माजी नगरसेवक काशिनाथ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्वयंभू प्रोडक्शन मुंबई निर्मित हा खेळ लावण्यांनाचा दर्जेदार लावण्यांचा अनोखा नजराणा आणि महाराष्ट्राची लोकधारा असा धडाकेबाज कार्यक्रम मुख्य आकर्षण ठरणार आहे.

जुईनगरमध्ये होत असलेल्या भव्य जत्रोत्सवाचे हे 23वे वर्ष आहे. ह्या जत्रोत्सवातील विविध कार्यक्रम नवी मुंबई करांसाठी मेजवानी ठरणारे आहेत. जुईनगरमधील नागरिक ह्या जत्रोत्सवाची आवर्जून वाट पाहत असतात. विविध कार्यक्रमांसह लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी,खाद्यपदार्थांची मेजवानी आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांनी ह्या जत्रोत्सवाचा मनमुराद आनंद घ्यावा.
                                                          -राजेश पाटील, भाजप महामंत्री

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply