Saturday , March 25 2023
Breaking News

राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी हंसनी पाटीलची निवड

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यातील पाले बुद्रुक येथील पुष्पनिकेतन शाळेच्या हंसनी पाटील हिची तुळजापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतून राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे 5 जुलै रोजी 12 वर्षांखालील मुले व मुलींची राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 32 जिल्ह्यांतून 450 खेळाडूंनी भाग घेतला होता. यामध्ये पनवेल तालुक्यातील पाले बुद्रुक येथील पुष्पनिकेतन शाळेची विद्यार्थिनी हंसनी पाटील, समृद्धी म्हात्रे व समीक्षा पाटील या विद्यार्थिनींनी कास्यंपदक जिंकले. हंसनी पाटीलची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या विद्यार्थ्यांना वैभव पेटकर, मिलिंद ठाकूर, सिद्धार्थ म्हसकर यांनी मार्गदर्शन केले होते. या सर्वांचे संस्थेच्या संचालिका मीना बन्सल, श्रुती बन्सल आणि मुख्याध्यापिका रेवती नायर यांनी अभिनंदन केले.   

Check Also

राहुल गांधी माफी मागा!.. भाजपचे पनवेलमध्ये आंदोलन; घोषणाबाजी करून निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या बेताल …

Leave a Reply