Breaking News

भारतीय फलंदाजांचा लाजिरवाणा पराक्रम

लंडन : वृत्तसंस्था

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाची अतिशय खराब सुरुवात झाली. पावसाने व्यत्यय आणल्यानंतर दुसर्‍या दिवसाच्या खेळात भारताने न्यूझीलंडला 239 धावांवर रोखले, मात्र 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवातही खराब झाली.

सलामीवीर रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली हे अवघी एक धाव काढून माघारी परतले. वन डे क्रिकेटच्या इतिहासात भारताच्या आघाडीच्या फळीतले तिन्ही फलंदाज एक धाव काढून माघारी परतण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply